'मेडिकलमध्ये चॉकलेट, आईस्क्रिम विकल्यास कडक कारवाई'

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा कडक कारवाई
medical store
medical storemedical store

औरंगाबाद: औषधींच्या दुकानावर (medical store) चॉकलेट, आईस्क्रिम विकले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. हे आता चालणार नाही. यापुढेही ब्रेक द चेन नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (sunil chavan) यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रावारी (ता.सात) झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे, तसेच अन्न व औषध प्रशासनाचे श्री. काळे, कृषि अधिकारी आनंद गंजेवार आदी उपस्थित होते.

medical store
मराठवाड्यातील मोठ्या धरणांत ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक

जिल्हाधिकारी म्हणाले, की बऱ्याच ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन होत नाही. अनेक औषधांच्या दुकानांवर आईसक्रीम, चॉकलेट्स तसचे इतर साहित्य विकले जात आहे. शहरात नागरिक अनेक ठिकाणी विनामास्क आणि विनाकारण फिरताना निदर्शनास येत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा. प्रादेशिक परिवहन विभागाने पेट्रोल पंपावर पथक तैनात करुन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी. राज्य उत्पादन विभागाने देखील मद्य विक्रेते नियमांचे पालन करत आहेत का हे गांभीर्यांने पाहावे.

medical store
जालन्यात कोरोना निर्बंध मोडणाऱ्या ४८ जणांवर गुन्हे दाखल

पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी मेडिकलवर शारीरिक अंतर पाळण्याचे नियम कडक करण्याचे निर्देश दिले. सकाळी ११ नंतर सुरू असणाऱ्या दुकानांवर कडक कारवाईचे संबंधितांना निर्देश दिले. अन्न व औषधी प्रशासनाचे काळे म्हणाले, की मेडिकलच्या दुकानांवर इतर साहित्यांची विक्री करणाऱ्या मेडिकल चालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादनचे श्री कदम यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या १७ आस्थापणांवर कारवाई केली असून आजपर्यंत ८९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे सांगितले. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी कोविडच्या पार्श्वभुमीवर नवीन वाहनांची नोंदणी पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com