मराठवाड्यातील मोठ्या धरणांत ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक

जायकवाडी धरणातून बाष्पीभवन सर्वाधिक
Jayakwadi
JayakwadiJayakwadi

औरंगाबाद: मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये सध्या ५३ टक्के पाणीसाठा आहे. या सर्व धरणांची पाणीसाठवण क्षमता (water storage capacity) ५ हजार १४३ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. तर सध्या या धरणांमध्ये ४ हजार ४२१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून यापैकी उपयुक्त पाणीसाठ्याचे प्रमाण २ हजार ७०९ दशलक्ष घनमीटर आहे. या ११ प्रकल्पांपैकी जायकवाडी धरणातील (Jayakwadi dam) पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जलसंपदा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार मराठवाड्यातल्या ११ मोठ्या प्रकल्पांची ५१४३ दशलक्ष घनमीटर इतकी पाणी साठवण क्षमता आहे , यापैकी एप्रिलअखेरपर्यंत या मोठ्या प्रकल्पांमध्ये २७०९ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणाची साठवण क्षमता २१७१ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. यात सध्या १८४३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे , यापैकी ११०५ दशलक्ष घनमीटर इतका उपयु्क्त पाणीसाठा आहे.

Jayakwadi
Beed Lockdown: बीड जिल्ह्यात कडक लॉकडाउन जाहीर

गेल्या आठवड्यात ११७९ इतका पाणीसाठा होता. परभणी जिल्ह्यातील येलदरीची साठवण क्षमता ८०९ दशलक्ष घनमीटर इतकी असून सध्या ६५९ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. यापैकी ५३५ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात या येलदरीत ५५० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वरची साठवण क्षमता ८१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र सध्या या ठिकाणी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही.

बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाची साठवण क्षमता ३१२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणात २५८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून त्यापैकी सध्या ११७ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात या धरणात १२१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. याच जिल्ह्यातील मांजरा धरणाची साठवण क्षमता १७७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणात ११६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून त्यापैकी सध्या ७० दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात या धरणात ७३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता.

Jayakwadi
Osmanabad Lockdown: जिल्ह्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; जाणून घ्या कोणत्या सुविधा सुरू राहतील

उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणाची साठवण क्षमता ९१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणात ८० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून त्यापैकी सध्या ५१ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात या धरणात ५३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. याच जिल्ह्यातील सिना कोळेगाव धरणाची साठवण क्षमता ७६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणात ८९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून त्यापैकी सध्या २८ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात या धरणात ३१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता.

परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरणाची साठवण क्षमता २४२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणात २६१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून त्यापैकी सध्या १५९ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात या धरणात १६४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणाची साठवण क्षमता ८१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणात ५३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून त्यापैकी सध्या ५१ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात या धरणात ४४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. याच जिल्ह्यातील निम्न मनार धरणाची साठवण क्षमता १३८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणात ६५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून त्यापैकी सध्या ५७ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात या धरणात ६२ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता.

Jayakwadi
जालन्यात कोरोना निर्बंध मोडणाऱ्या ४८ जणांवर गुन्हे दाखल

उर्ध्व पेनगंगा यवतमाळ जिल्हात जरी असले तरी त्याचे पाणलोट क्षेत्र मराठवाड्यात आहे. या धरणाची साठवण क्षमता ९६४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणात ८५० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून त्यापैकी सध्या ५३६ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात या धरणात ५६४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता.


पाण्याचे मोजमाप
० १ हजार दशलक्ष लिटर म्हणजे १ दशलक्ष घनमीटर पाणी
० जायकडवाडी धरणातुन बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त . रोज होते १.५८ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन
० सर्वात कमी बाष्पीभवन निम्न दुधनातुन. रोज होते ०.५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com