
छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासन व यूजीसीच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी, तसेच सीएचबी पद्धत कायमची बंद करून समान काम समान वेतन अर्थात वर्षभराच्या नियुक्तीसह ८४ हजार रुपये दरमहा वेतन लागू करावे, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नियुक्ती करावी, या प्रमुख मागण्यांसाठी नेट-सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी (ता. २०) पुणे येथील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर सत्याग्रह करण्यात आला.