sanjay shirsat
sakal
छत्रपती संभाजीनगर - निवडणुकीत जागावाटपाची कोंडी वाढल्यानंतर थेट युती तोडून टाकणारे पालकमंत्री संजय शिरसाट प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात मात्र मुलगा आणि मुलीच्या आणि एक-दोन उमेदवारांच्याच प्रचारात सक्रिय राहिले. त्यांनी अशी भूमिका घेतल्याने त्यांचे सर्मथकही बुचकळ्यात पडले. दुसरीकडे आमदार प्रदीप जैस्वाल, खासदार संदीपान भुमरे, माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी मात्र शहरभर प्रचारात झोकून दिले होते.