छत्रपती संभाजीनगर : कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने १४ हजारांचे कर्ज फेडण्यासाठी मित्रासोबत मिळून दुचाकी चोरी केल्याचा प्रकार समोर आला. जवाहरनगर पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. .आदित्य गणेश राजपूत (२५, रा. शास्त्रीनगर, मूळ रा. बुलडाणा) आणि प्रणव विकास घोडके (रा. विशालनगर, गारखेडा परिसर) अशी संशयितांची नावे आहेत. आदित्य कॉम्प्युटर हार्डवेअरचे शिक्षण घेतो. त्याच्यावर १४ हजारांचे कर्ज झाले होते..ते फेडण्यासाठी त्याने दुचाकी चोरीची शक्कल लढवली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणात कैलासनगरात राहणाऱ्या लता माणिक चुंगडे (वय ४५) यांची दुचाकी (एमएच २० एचए ४७६९) शनिवारी (ता. १४) शास्त्रीनगर येथील किड्स प्राइड स्कूलजवळून चोरील गेली होती..Chh. Sambhaji Nagar News : चिकलठाणा येथे भरधाव दुचाकीस्वाराचा भीषण मृत्यू.तपास सुरू असताना एकजण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी गजानन मंदिर ते कडा कार्यालय परिसरात येणार असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या आदित्यला पकडले..त्यानंतर त्या माहितीच्या आधारे घोडकेला दौलताबाद येथील एका ढाब्यावरून अटक केली. ही कारवाई हवालदार अनिल भाले, हवालदार वामन नागरे, मारोती गोरे, ज्ञानेश्वर शेलार आदींनी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.