Student: सकाळ तनिष्का यिन व पोलिस दलाचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थी सुरक्षा व व्यसनमुक्ती जागर अभियानात हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
Social Awareness: छत्रपती संभाजीनगरात ‘सकाळ’, ‘तनिष्का’, ‘यिन’ व पोलिस दलातर्फे व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, महिला सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेतला.
छत्रपती संभाजीनगर : ‘व्यसन करणार नाही, करूही देणार नाही, मादक पदार्थांपासून दूर राहीन’ असा निर्धार विद्यार्थ्यांनी घेतला आणि समाजप्रबोधनासाठी आपला वाटा उचलण्याचा संकल्प केला.