
आडूळ : पैठण तालुक्यातील आडूळ येथील माध्यमिक शाळेत देवगाव, जामवाडी तांडा, गेवराई मर्दासह परिसरातील २० ते २५ गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. परंतु, खराब रस्त्यांमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्त करा, अन्यथा आम्ही पुढील शिक्षण घेणार नाही, असा इशाराच विद्यार्थिनींनी दिला आहे.