Raj Thackeray Rally | 'औरंगाबादची जबाबदारी राज ठाकरे यांनी घेतली आहे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

'औरंगाबादची जबाबदारी राज ठाकरे यांनी घेतली आहे'

औरंगाबाद : हे संभाजीनगर आशियातील सर्वात वेगाने वाढणार शहर होतं. शहराला आठ दिवसाने पाणी येते. हे कोणामुळे झाले तर पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेमुळे ! यांना लुटारु पुरस्कार द्यायला हवे, असा हल्लाबोल मनसे नेते सुमीत खांबेकर यांनी शिवसेनेवर केले. आज औरंगाबाद (Aurangabad) येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होत आहे. त्यापूर्वी खांबेकर बोलत होते. ते म्हणाले, २५०० कोटी रुपये पाण्यावर खर्च झाले. पण पाणी मिळाले नाही. सोळाशे कोटींची असलेल्या पाण्याच्या योजनेचेही रेट वाढणार आहे. (Sumit Khambekar Says, Raj Thackeray Take Responsibility Of Aurangabad MNS latest news)

नर्मदेचे पाणी ९०० किलोमीटरवर जाऊ शकते. मात्र ५० किलोमीटरवरुन औरंगाबादला पाणी येऊ शकत नाही. ही कृपा कोणाची शिवसेनेची असा आरोप खांबेकर यांनी केले. शहरात पार्किंग मिळणार नाही. महिलांसाठी प्रसाधनगृह बोटांवर मोजण्याइतकेचं आहेत. भारनियमनावर सर्वात प्रथम मनसेने आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात सर्वाधिक कामे केले. आज हे शहर अनाथ झाले आहे. या शहराची जबाबदारी राज ठाकरे यांनी घेतली आहे.

या शहरामध्ये गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये एक तरी उद्योग आलेले नाही. येथील तरुण पोर पुणे-मुंबईला जातात. ही भगवी ताकद महापालिकेत न्यायची आहे. शिवमुद्रा असलेला झेंडा न्यायचा आहे, असे खांबेकर म्हणाले.