Chh. Sambhajinagar Crime: हा डेमो, ऐकले नाही तर दुसरा वार थेट गळ्यावर! अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडितेवर दबाव
Crime News: छत्रपती संभाजीनगरात अत्याचार पीडितेवर दबाव आणण्यासाठी तिला मारहाण करून धारदार शस्त्राने वार करण्यात आला. ‘गुन्हा मागे घे नाहीतर थेट गळ्यावर वार होईल’ अशी जीवघेणी धमकी आरोपींनी दिली.
छत्रपती संभाजीनगर : अत्याचारातील पीडितेला मारहाण, धारदार वस्तूने वार करीत, ‘आमची फार वरपर्यंत ओळख आहे. गुन्हा मागे घे, नाहीतर हा फक्त डेमो होता. दुसरा थेट गळ्यावर होईल’, अशी धमकी देत पीडितेवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला.