Suvarna Mane : उपवनसंरक्षकपदी प्रथमच पूर्णवेळ महिला अधिकारी; सुवर्णा माने यांनी स्वीकारला पदभार
First Female Forest Conservator : सुवर्णा माने यांनी उपवनसंरक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झालेले सूर्यकांत मंकावार यांच्या ३७ वर्षांच्या सेवेनंतर वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे उपवनसंरक्षक सूर्यकांत विठ्ठलराव मंकावार ता. ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. ३७ वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त विद्यमान उपवनसंरक्षक सुवर्णा माने, वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.