दोन कॉलम
--
LTR19HTP01.jpg लातूर ः येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी दीप्ती पिंपरे हीच्या `स्वप्नांची भरारी` कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी.
---
''स्वप्नांची भरारी'' कवितासंग्रहाचे प्रकाशन
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १९ ः येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात बी.एस्सी.तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या दीप्ती दिलीप पिंपरे या विद्यार्थीनीच्या ''स्वप्नांची भरारी'' या कावितासंग्रहाचे प्रकाशन मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी व सचिव रमेश बियाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे संयुक्त सचिव विशाल लाहोटी, ॲड. श्रीकांत उटगे, ॲड. आशिष बाजपाई, अशोक पाटील, कुणाल कोरे, चैतन्य भार्गव, सतीश मंदाडे, शैक्षणिक विकास अधिकारी डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, प्राचार्य डॉ. पुनम नाथानी, प्राचार्य डॉ. क्रांती सातपुते, प्राचार्य डॉ. गोपाल लोहिया, प्राचार्य प्रिती पटवारी, उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब सरवदे, पर्यवेक्षिका डॉ. संध्या कोल्हे, डॉ. हेमंत वरूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थीदशेत अगदी कमी वयात कावितासंग्रह प्रकाशित केल्याबद्दल पिंपरे हीचे कौतूक करण्यात आले. यावेळी दीप्ती पिंपरे हिने आपल्या कविता म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या करिता प्रा. मेघा पंडित, डॉ. गजानन बने व डॉ. रामशेट्टी शेटकार यांनी तिला मार्गदर्शन केले.