सय्यद मतीन राष्ट्रवादीतूनही निलंबित | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सय्यद मतीन राष्ट्रवादीतूनही निलंबित

औरंगाबाद : सय्यद मतीन राष्ट्रवादीतूनही निलंबित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राजकीय वाद ओढवून घेणारे व सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले माजी नगरसेवक सय्यद मतीन यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. यापूर्वी त्यांची ‘एमआयएम’मधूनही हाकालपट्टी करण्यात आली होती.

सय्यद मतीन यांना निलंबित करण्यात आल्याबाबतचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणिस शिवाजीराव गर्जे यांच्या स्वाक्षरीत जारी करण्यात आले. यात ‘‘आपण पक्ष शिस्तीविरुद्ध व पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशा वर्तनाबाबतच्या तक्रारी प्रदेश कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. याबाबतची सत्यता पडताळणी झाल्यानंतर अशा प्रकारचे वर्तन करू नये अशा सूचना देण्यात आल्या. तरीही वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे पक्षातून निलंबित करण्यात येत आहे. असा आशय पत्रात आहे.

हेही वाचा: अकोला : लिपिक व नायब तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा

सय्यद मतीन यांची ‘एमआयएम’मधील राजकीय कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली त्यानंतर त्यांनी ‘राष्ट्रवादी’त उडी घेतली होती; पण पक्षाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य होत असल्याच्या तक्रारीवरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

‘राष्ट्रवादी’तून शेख जफर यांचीही हकालपट्टी

राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा मलिन करीत असल्याचे कारण पुढे करीत एमआयएममधून राष्ट्रवादीमध्ये माजी नगरसेवक शेख जफर यांना शुक्रवारी (ता. १९) पक्षातून निलंबित करण्यात आले. शेख जफर यांच्यासह सय्यद मतीन यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या वाढत्या क्लेषदायी कृत्यामुळे निवडणुकीत पक्षाला नुकसान होऊ शकते. या संदर्भाचे पत्र शहराध्यक्ष विजय साळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे पाठविले होते. त्यानुसार १९ नोव्हेंबरला दोघांचेही निलंबन करण्यात आले.

loading image
go to top