esakal | खबरदार! शेजाऱ्याची वीज चोराल तर...? काय सांगतो कायदा?
sakal

बोलून बातमी शोधा

Power theft

खबरदार! शेजाऱ्याची वीज चोराल तर...? काय सांगतो कायदा?

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगबाद : शेजाऱ्याकडून वीज पुरवठा घेतला तर तो बेकायदा ठरतो. किंवा तुम्ही घरगुती वापराची वीज समोर टाकलेल्या दुकानासाठी वापरत असाल तरीही गुन्हा ठरतो. एवढेच नव्हे तर मंजूर पेक्षा अधिक भार वापरत असाल तरही तुम्ही गुन्हेगार ठरता त्यामुळेच नकळत होणाऱ्या या चुकांकडे दुर्लक्ष करता कामा नये. महावितरणने गेल्या दिड वर्षात अशा प्रकारची साधारण तीन लाख युनिटची चोरी उघड करुन दोनशे पेक्षा अधिक ग्राहकांवर कारवाई केली आहे.

हेही वाचा: महिलेबाबत भाजप अधिकाऱ्याची पोस्ट;पाहा व्हिडिओ

अनेक वेळा वीज कनेक्शन थकबाकी किंवा अन्य कारणासाठी कापला तर सरळ शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा जोडून घेतो, ही अगदी सहज प्रवृत्ती आहे. असा वीजपुरवाठा तुम्ही अगदीच रात्रभरासाठी घेत असाल तर कदाचीत दुर्लक्ष होऊ शकेल, अन्यथा असा शेजाऱ्याकडून पुरवठा घेणाऱ्यावर आणि पुरवठा जोडून देणाऱ्यावरही कारवाई केली जावू शकते. रस्त्यावर घर आहे म्हणून सुरु केलेल्या दुकानाला घरातून वीज पुरवठा केला जातो हेही बेकायदेशीर आहे. जर घराच्या समोर दुकान असेल तर त्यासाठी कर्मशियल वापाराचे वीजमिटर घेणे आवश्यक आहे. घरातील मिटरमधून दुकानाला वीज पुरवठा केला तर तो अनधिकृत ठरतो. त्यामुळे भरारी पथकांच्या मार्फत केव्हाही कारवाई होऊ शकते.

हेही वाचा: किलोमीटर चिखल तुडविण्याची नामुष्की.... !; पाहा व्हिडिओ

काय सांगतो कायदा

विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याबद्दल कारवाई होते. तसेच मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सर्व्हिसवायर टॅप करणे यासाठी कलम १३५ नुसार तुम्ही गुन्हेगार आहात. त्याचप्रमाणे महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे यासाठी कलम १३८ नुसार कारवाई केली जाते.

महावितरणतर्फे वीज चोरीला आळा बसण्यासाठी 'वीज चोरी कळवा बक्षिस मिळवा' ही योजना सुरु केलेली आहे. या योजनेत वीजचोरीची माहिती देणाऱ्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते. त्याचप्रमाणे वीजचोराकडून वसूल करण्यात आलेल्या एकूण रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येते.

हेही वाचा: औरंगाबाद: तपोभूमी गोगाबाबा टेकडी

तीन लाख युनिटची चोरी

अनधिकृत वीजेचा वापर करणे, घरगुती वीज व्यावसायीक दुकानात वापरणे किंवा मंजूर भारापेक्षा अधिक वीज वापरणे यासाठी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात गेल्या दिड वर्षात केलेली कारवाई

एप्रिल २०२१ ते मार्च २०२१

शहर प्रकरणे युनिट चोरी वसुल रक्कम (लाखात)

  • औरंगाबाद शहर -६,९१,८६,२६९

  • औरंगाबाद ग्रामिण -७८, ६४,३१९

  • जालना- ९३,२३,९४३

एकूण- १७,०२,६२६०

एप्रिल ते जुलै २०२१-

  • औरंगाबाद शहर -२१,२२,२६०

  • औरंगाबाद ग्रामिण- २,२८,०४८

एकूण- ४३, ५०,२१८

loading image
go to top