छत्रपती संभाजीनगर - शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी तीन-तीन योजना असताना पाण्याच्या वेळापत्रकाचे मात्र तीनतेरा वाजले. दुसरीकडे महापालिकेच्या मालकीच्या व खासगी विहिरींकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेच्या लेखी शहर, परिसरात ३०५ विहिरी असून, त्यात महापालिकेच्या ९९ विहिरी आहेत.