रांजणी रेल्वे स्थानकावर जनसंवाद

रांजणी रेल्वे स्थानकावर जनसंवाद
Published on: 
तपोवन, पुणे एक्स्प्रेसला रांजणीत द्या थांबा; रेल्वेच्या जनसंवादात मागण्या ----- रांजणी, ता. २२ (बातमीदार) : नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने रांजणी रेल्वेस्थानकावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ आणि प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. तपोवन एक्स्प्रेस आणि पुणे एक्स्प्रेसला रांजणी येथे थांबा देण्यासह स्थानकावरील विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. रांजणी स्थानकावर तपोवन आणि पुणे एक्स्प्रेसला थांबा मिळाल्यास परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांना थांबा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याशिवाय तिसऱ्या रेल्वेमार्गाची सुविधा, प्लॅटफॉर्मवरील सोयी वाढविणे, स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पादचारी पूल किंवा योग्य प्रवेशमार्ग उपलब्ध करून देणे, तसेच ऊन-पावसापासून संरक्षणासाठी शेड उभारण्याच्या मागण्या मांडण्यात आल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनचे काम लवकरच ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनचे काम मंजूर झाले असून, ते लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. अन्य समस्यांचीही नोंद घेऊन त्या पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाला रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता शशांक नामदेव, विशाल बोरकर, स्टेशन मास्तर मीना सर यांच्यासह रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. तसेच गौतम देशमुख, मोहिन बेग, विठ्ठल देशमुख, इफ्तेकार कुरेशी, अमोल देशमुख, अन्सार शेख, ज्ञानेश्वर आढाव, परमेश्वर जाधव, अन्वर शहा, अरबाज आतार, संतोष सोसे, जहीर भाई, मच्छिंद्र घुले, मुजीब पठाण, शिवाजीराव मोरे, शंकर वाघमारे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com