छत्रपती संभाजीनगर - केंद्र शासनाने १ एप्रिल २०२५ पासून नवीन कराचे दर लागू केले आहेत. यात ज्यांचे उत्पन्न १२ लाख रुपये आहे त्यांना एक रुपयाही आयकर भरावा लागणार नाही. मात्र, ज्यांचे उत्पन्न त्यापेक्षा जास्त गेल्यास म्हणजे १२ लाख एक रुपये जरी झाले तरी त्यांना ६० हजार रुपये आयकर भरावा लागू शकतो. शिवाय १३ लाख उत्पन्न असेल तर त्यांना ७५ हजार रुपये आयकर भरावा लागणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात केंद्र शासनाने नवीन कर प्रणाली लागू करून १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना करमुक्त करून दिलासा दिला. दुसरीकडे याचा लाभ मोजकेच उद्योजक, व्यापारी, नोकरदारांना होणार आहे.
आयकर विभागाकडून देण्यात आलेल्या स्लॅबमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले; कारण एकीकडे १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त आहे, असे सांगत असतानाच दुसरीकडे ४ लाख रुपये उत्पन्नासाठी शून्य रुपयाचा कर, तर ४ लाख ते ८ लाख दरम्यानच्या उत्पन्नास ५ टक्क्यांप्रमाणे २० हजार रुपये, तर तिसऱ्या स्लॅबमध्ये ८ लाख ते १२ लाख रुपयांस १० टक्क्यांप्रमाणे ४० हजार रुपये लागणार असल्याचे स्पष्ट केले.
मात्र, जेव्हा १२ लाखांपेक्षा १ रुपयाही अधिक उत्पन्न असेल तरच हा स्लॅब उपयोगात येणार आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न १२ लाखांपर्यंत आहे, त्यांना शासनाने आयकरातून वगळल्याचे समोर आले.
नोकरदारांना ७५ हजार सूट
आयकर विभागाकडून १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केले असले तरी नोकरदार वर्गास नियमानुसार किंवा स्टँडर्ड डिडक्शनप्रमाणे कलम ८७ ए अंतर्गत सामान्य वजावट ७५ हजार रुपये केली. यातून १२ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत निव्वळ करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर दायित्व नसणार आहे.
असे आहेत स्लॅब
शासनाने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले. पण, त्यापेक्षा जास्त रक्कम किंवा उत्पन्न असलेल्यांना मात्र ४ लाख रुपयांच्या स्लॅबपासून कर लागणार असल्याचे समोर आले. यात साधारण १३ लाख रुपये सर्व उत्पन्न असेल तर त्यांना चौथा स्लॅब १५ टक्क्यांप्रमाणे ७५ हजार रुपये आयकर भरावा लागणार आहे. यात त्यानंतरचा स्लॅब १६ लाख ते २० लाख आहे. यात १७ लाख रुपयांचे उत्पन्न असेल तर त्या व्यक्तीस १ लाख ४० हजार रुपये आयकर भरावा लागेल.
शासनाने १२ लाख रुपयांची आयकर मर्यादा दिली. यामुळे केंद्र सरकारला १ लाख कोटीपेक्षा अधिकच्या कराच्या रकमेला मुकावे लागणार आहे. या वाचणाऱ्या रकमेतून अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
- रोहन अचलिया, सीए तथा कर सल्लागार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.