बजाजनगर : रांजणगाव शेणपुंजी येथे दहावर्षीय मुलीवर क्लासेसच्या एका ४५ वर्षीय शिक्षकाने अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी (ता. १५) उघडकीस आला. सुभाष जाधव (रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव, मूळ गाव हिवरा आश्रम) असे संशयिताचे नाव आहे..पोलिस तक्रारीचा आशय असा : रांजणगाव येथे नर्सरी कॉलनीमधील एका खासगी शिकवणी वर्गात जाधव हा शिक्षक आहे. तो एमए इंग्रजी, एमएड झालेला आहे. तीन दिवसांपूर्वी जाधवने पीडित मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केला. शिवाय हा प्रकार कुणाला सांगितला तर आई-वडिलांचे तुकडे करेल अशी धमकी दिली. दोन दिवसांपासून मुलगी क्लासला जात नसल्याने आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्या आधारे वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला..दीड वर्षापूर्वी नोकरीवरून काढलेजाधव हा रांजणगाव शेणपुंजी येथील एका खासगी शाळेत नोकरीला होता. परंतु, त्याचे गैरवर्तन लक्षात आल्याने त्याला दीड वर्षापूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आले. आता तो खासगी क्लासमध्ये शिकवतो..Chh. Sambhaji Nagar News : परम महंत बाभूळगावकर बाबांना साने गुरुजी समता पुरस्काराने गौरव.जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंगजोगेश्वरी परिसरात शनिवारी (ता. १३) एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग झाला. पीडितेच्या आईने रविवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारे सुभाष गंगाधर कर्डक याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला..जमावाने दिला चोपघटना माहीत होताच जमावाने शिक्षकाला चोप दिला. माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे आणि ग्रामपंचायत सदस्य कीर्तिकर यांनी पीडित मुलगी आणि तिच्या आई-वडिलांना आधार देत पोलिस ठाण्यात नेले. मारहाणीत जाधव जखमी झाल्याने सध्या त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारणानंतर पोलिस त्याला ताब्यात घेणार आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.