
छत्रपती संभाजीनगर : सध्या विविध शस्त्रक्रियांचा होणारा खर्च हा वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे वाढतो. देशात यातील तंत्रज्ञान, मशीन्स तयार झाल्यास हा खर्च निश्चित कमी होईल, असे मत तज्ज्ञांनी रविवारी (ता.१५) व्यक्त केले. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियामार्फत आयोजित ‘ सर्जन्स वीक’ अंतर्गत कार्यक्रमासाठी देशभरातून तज्ज्ञ येथे सहभागी झाले होते.