esakal | एका दिवसात संपल्या दहा हजार कोरोना लसी, आज सात केंद्रावर लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

एका दिवसात संपल्या दहा हजार कोरोना लसी, आज सात केंद्रावर लसीकरण

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरासाठी Aurangabad महापालिकेला गुरुवारी (ता. १५) प्राप्त झालेल्या १२ हजार कोव्हिशील्ड Covishield लसींपैकी १० हजार २०० लसी दिवसभरात संपल्या. त्यामुळे उर्वरित १८०० लसी शुक्रवारी (ता. १६) सात केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. शहरात गुरुवारी ३९ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३४ केंद्रावर दुसरा डोस तर पाच केंद्रावर पहिला डोस देण्यात आला. त्यानुसार सकाळपासूनच नागरिकांनी कुपन घेण्यासाठी केंद्रावर रांगा लावल्या. प्रत्येक केंद्रावर दीडशे लसी देण्यात आल्या. कोविन अ‍ॅपव्दारे Co-win ऑनलाइन नोंदणी करून पाच केंद्रावर पहिला डोस घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे केंद्रावर गोंधळ उडाला नाही.ten thousand corona vaccines over within a day in aurangabad glp88

हेही वाचा: PHOTOS : अखेर शाळेची घंटा वाजली, खूप दिवसानंतर भरले वर्ग

दिवसभरात नऊ हजार ५०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला तर ७०० जणांना पहिला डोस देण्यात आला. दरम्यान १८०० लसींचा साठा शिल्लक असल्याने शहरातील सात केंद्रावर शुक्रवारी लसीकरण होणार आहे. पहिल्या डोससाठी सादातनगर आणि चेतनानगर आरोग्य केंद्रावर व्यवस्था करण्यात आली तर दुसऱ्या डोससाठी जवाहर कॉलनी, सिडको एन-८, सिडको एन-११, पुंडलीकनगर, बन्सीलालनगर या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

loading image