

Terakhda firecracker factory blast
sakal
येरमाळा : वाशी तालुक्यातील तेरखेडा गावाजवळ असलेल्या एका फटाका निर्मिती कारखान्यात संध्याकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेदरम्यान भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली.सुदैवाने आज तेरखेडा येथे आठवडी बाजार असल्याने कारखान्याला सुट्टी होती. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र कारखानदाराचे लाखो रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, वाशी तालुका हा फटाका उद्योगासाठी प्रसिद्ध असून तेरखेडा गावाला ‘मराठवाड्याची शिवकाशी’ म्हणून ओळखले जाते. या परिसरात फटाके निर्मितीचे असंख्य कारखाने कार्यरत असून अनेक कुटुंबांची उपजीविका या उद्योगावर अवलंबून आहे.