Sambhaji Nagar News : शहरात सेफ सिटी ट्रस्ट हवा

सुरतच्या धर्तीवर महापालिकेचा शासनाला प्रस्ताव
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीची देखभाल-दुरुस्ती पाच वर्षे कंत्राटदार करणार आहे. त्यानंतर मात्र हा प्रकल्प अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे सुरत शहराच्या धर्तीवर शहरात सेफ सिटी ट्रस्ट तयार करण्यात यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आल्याचे महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (ता. २२) सांगितले.

स्मार्ट सिटी अभियानातून शहरात एमएसआय प्रकल्पाअंतर्गत सुमारे ७०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मुख्य रस्ते, चौकांमध्ये हे कॅमेरे असून, पोलिस आयुक्त हद्दीतील पोलिस ठाणे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास मदत होते. सीसीटीव्हीचे एक कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रूममधून पोलिस आयुक्तालयात तर दुसरे स्मार्ट सिटी कार्यालयात आहे. त्यानंतर सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून ‘आयस्कोप’ प्रकल्प राबविण्यात आला.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : आयसीयूच्या ४० खाटा तयार

त्यात १२५ कॅमेऱ्यांची भर पडली. या कॅमेऱ्यांमध्ये फेसरीडिंग, एनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकन्सिलिएशन) कॅमेऱ्यांचा समावेश आहे. या अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना थेट पावती मिळणार आहे. या कॅमेऱ्यांची देखभाल-दुरुस्ती पाच वर्षांसाठी कंत्राटदाराकडे आहे. त्यानंतर या कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीची तरतूद शासनाला करावी लागणार आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत जी. श्रीकांत म्हणाले, की सुरत शहरात सीसीटीव्हींची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून कॅमेऱ्यांचे अपग्रेडेशन, देखभाल दुरुस्तीचा खर्च केला जातो. याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगर शहरातदेखील सेफ सिटी ट्रस्टची स्थापना करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला असल्याचे प्रशासकांनी नमूद केले.

दंडाच्या रकमेतून देखभाल, दुरुस्ती

अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा वापर करून पोलिस बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल करतात. या दंडातील ठरावीक रक्कम बाजूला काढून ती कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरली जाऊ शकते. उर्वरित रक्कम शासनाच्या तिजोरीत जाऊ शकते, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com