Sambhaji Nagar News : आयसीयूच्या ४० खाटा तयार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाटी प्रशासन सज्ज
sambhaji nagari
sambhaji nagarisakal

छत्रपती संभाजीनगर : राज्यात कोरोनाच्या नव्या जेएन वन व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यासाठी आधार असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) प्रशासन सज्ज आहे. सध्या रुग्णालयात ४० आयसीयू खाटा तयार असून, रुग्णांच्या संख्येनुसार यात वाढ केली जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी शुक्रवारी (ता. २२) सांगितले.

sambhaji nagari
Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरचे पोलिस ठरले सायबर गुन्हेगारांनाही भारी

चार वर्षांत संपूर्ण जगाला हादरून सोडलेल्या कोरोनाचा राज्यात पुन्हा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी औषधसाठा, साधन सामग्रीसह सज्ज राहावे तसेच सारी, सर्दी, ताप, खोकल्यासह संशयित रुग्णांची कोरोना चाचण्या करण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.

sambhaji nagari
Chhatrapati Sambhajinagar Crime : परप्रांतीय व्यापाऱ्याकडून ९९ लाखांची फसवणूक

या पार्श्वभूमीवर मागील कोरोनाच्या सर्वच लाटेत रुग्णांसाठी मोठे आधार ठरलेले घाटी रुग्णालयाची नेमकी काय तयारी आहे, याबाबत डॉ. सुक्रे यांना विचारले असता, ‘‘रुग्णालयात सध्या ४० आयसीयू बेड तयार आहेत. यासह ऑक्सिजन, रेमेडीसिव्हर, ऑक्सिजन बेड याचा शुक्रवारी आढावा घेतला. तपासणी करणाऱ्या किटपासून औषधी साठा असो की इतर गोष्टी सर्व दृष्टीने घाटी प्रशासन सज्ज आहे. यापूर्वी आपल्याला अगदी पहिल्यापासून सुरुवात करावी लागली होती. परंतु, आता तज्ज्ञ डॉक्टर, लॅब आपल्याकडे उपलब्ध आहेत. बैठकीत या सर्वांनाच तयारीत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत’’, अशी माहिती त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com