औरंगाबाद : शहराचा पॉझिटिव्हीटी रेट गेला ८.६३ टक्क्यांवर

होमआयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या अधिक
covid
covid

औरंगाबाद : मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद शहरातही कोरोनाचा संसर्ग(covid patient ) वाढताना दिसत आहे. रुग्णांचा आकडा शंभरच्या पुढे जात असल्याने शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा ८.६३ टक्क्यांवर पोचला असून, ही बाब शहरासाठी चिंताजनक मानली जात आहे.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर (mini lockdown declared)करत निर्बंध आणखी कडक केले आहे.

covid
आरे ला कारे! धोनीला ट्रोल करणाऱ्या KKR ला जाडेजाचा कडक रिप्लाय

दिवाळी सण, नाताळ सण, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त औरंगाबादेत बाजारपेठा, हॉटेल, रेस्टॉरंटवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीचे पडसाद आता औरंगाबाद शहरात दिसून येत आहे. जानेवारीचा महिना लागल्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. मागील चार दिवसांपासून शहरात शंभरपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नव्याने भर पडत आहे. ही संख्या अशीच वाढत राहिल्यास अवघ्या दोनच दिवसांत शहरातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची हजाराच्या घरात जाण्याची भीती पालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. रविवारी दिवसभरात २१६८ आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. रविवारी दिवसभरात केलेल्या अ‍ॅन्टिजेन चाचण्यांचे अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

covid
Podcast : ...तर बार होतील बंद ते जीम-ब्युटी पार्लर-सलूनसाठी दिलासा

शहरात ६६४ सक्रिय रूग्ण

रविवारी दिवसभरात १८३ कोरोनाबाधीत आढळल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ६६४ वर पोचली आहे. यातील सर्वाधिक १०८ रूग्ण पालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रूग्णालयात दाखल आहेत. तर, घाटीमध्ये २८ जण उपचार घेत आहेत. खासगी रूग्णालयांत ७५ बाधीतांवर उपचार सुरू आहेत.

४४८ जण होमआयसोलेशनमध्ये

कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या बाधितांची संख्या अधिक निघेल, असा अंदाज आरोग्य विभागाने आधीच व्यक्त केला होता. त्यानुसार सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने घरीच उपचार करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यानुसार रविवारपर्यंत ४४८ बाधित होमआयसोलेशनअंतर्गत घरीच उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com