

Shelgon Khurd Harinam Saptah 2026
esakal
फुलंब्री : तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. २६ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ दरम्यान झालेल्या या सप्ताहात दररोज हरिनामाचा अखंड गजर घुमत असून परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून अध्यात्मिक समाधान लाभ घेतला. शेवटी काल्याच्या कीर्तनाने या सुवर्ण महोत्सवी सप्ताहाची सांगता झाली.