esakal | पाच जिल्ह्यांत खरिपाच्या पिकांचे सर्वाधिक नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप पिकांचे नुकसान

पाच जिल्ह्यांत खरिपाच्या पिकांचे सर्वाधिक नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड आणि लातूर या पाच जिल्ह्यांत खरिपाच्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय वाहून गेलेल्या पाच नागरिकांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी पाच घरांची पडझड झाली असून ३५ जनावरे मरण पावली आहेत. विभागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा: खबरदार! शेजाऱ्याची वीज चोराल तर...? काय सांगतो कायदा?

मराठवाड्यात दोन आठवडे दडी मारून असलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. सोमवारी दिवसभर मध्यम स्वरूपाची हजेरी लावल्यानंतर मध्यरात्रीपासून जोर वाढला. त्यामुळे बीड, नांदेड, औरंगाबाद आणि जालन्यातील काही मंडळांत ढगफुटीसदृश पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नदी, पाझर तलाव आणि बंधाऱ्यांलगत असलेल्या शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी देखील विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे.

हेही वाचा: महिलेबाबत भाजप अधिकाऱ्याची पोस्ट;पाहा व्हिडिओ

दरम्यान सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० या २४ तासांत विभागात पुरामध्ये वाहून गेल्याने ३५ जनावरे मरण पावली आहेत. यात औरंगाबादेत लहान-मोठी १९, जालन्यात २, नांदेडमध्ये १४ अशा जनावरांचा समावेश आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे जालन्यातील अंबडमध्ये एका घराची पडझड झाली आहे. दोन पूल वाहून गेले. नांदेडमध्ये एका घराचे अंशत: नुकसान झाले आहे. बीडमध्ये तीन घरांची पडझड झाली आहे. विभागात दोन दिवसांच्या पावसात मका, सोयाबीन, कापूस या पिकांसह फळबागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासंदर्भातील प्राथमिक अंदाज विभागीय आयुक्तालयाच्या वतीने गुरुवारी राज्य शासनाला पाठविला जाणार आहे.

७ मंडळांत अतिवृष्टी-

औरंगाबादेत सिल्लोड ७१ मि.मी., गोलेगाव ११४.७५ मि.मी., जालन्यात भोकरदन ११२ मि.मी., सिंपोरा ७७.५० मि.मी., धावडा ६६.२५ मि.मी., आन्वा १४१.७५ मि.मी., जाफ्राबाद ८५ मि.मी. पाऊस झाला.

loading image
go to top