esakal | कोविड चाचण्‍यांत ‘घाटी़’आघाडीवर; राज्यात पहिल्या क्रमांक

बोलून बातमी शोधा

ghati hospital at aurangabad

कोविड चाचण्‍यांत ‘घाटी’आघाडीवर; राज्यात पहिल्या क्रमांक

sakal_logo
By
मनोज साखरे -सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : येथील 24 तास कार्यरत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)च्या प्रयोगशाळेने कोविड चाचण्यांचे परीक्षण करण्यात राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. आतापर्यंत सर्वांत जास्त तीन लाख ९७८८ नमुन्यांचे परीक्षण करून अहवाल देण्यात आला आहे.

घाटीची ‘व्हीआरडीएल’प्रयोगशाळेत जिवाची बाजी लावून अहोरात्र प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डॉक्टर्स व इतर सहायक काम करीत आहेत. एप्रिल २०२० पासून ही प्रयोगशाळा रुग्णांचे अहवालाचे विश्‍लेषण करीत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पर्यायाने चाचण्यांची संख्याही दरदिवशी पाच हजारांवर गेली. तरीही येथील प्रयोगशाळेत चाचण्यांचे परीक्षण व अहवाल देण्याचे कार्य अहोरात्र सुरू आहे.

हेही वाचा: कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; मात्र आरोग्य विभाग गायब

अशी आहे क्रमवारी

चाचणीनंतर परीक्षण करून अहवाल देण्यात अशी आघाडी ः पहिला क्रमांक घाटी रुग्णालय, औरंगाबाद (३,०९,७८८). दुसरा- एनआयव्ही पुणे (३,०२,७८८), तिसरा- बीजेजीएमसी पुणे (२,९९,८८०), चौथा- आरसीएसएम जीएमसी कोल्हापूर (२,७६,९१२), पाचवा- एमएमटीएच, नवी मुंबई (२,६९,१४०), सहावा- आयजीएमसी नागपूर (२,६४,८७४), सातवा- जीएमसीएच, नागपूर (२,२६,८९०). जालना येथील जिल्हा रुग्णालयाचा (१,३४,५८०) २५ वा क्रमांक आहे.