farmer cibil score
sakal
- हरेंद्र केंदाळे
छत्रपती संभाजीनगर - राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यापासून शेतकऱ्यांमध्ये कर्ज न भरण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधी नियमित हप्ते भरले होते, त्यांनीही आता हप्ते भरणे थांबवले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांची खाती ‘एनपीए’मध्ये गेली असून त्यांच्या सिबिल स्कोअरवर अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, कर्जमाफी मिळाली तरीही हा स्कोअर लवकर सुधारणार नसल्याने बँका नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करण्याची भीती निर्माण झाली आहे.