esakal | शेतकऱ्याच्या घरातून तीन तोळे सोने चोरीला; एका आठवड्यात लोहगाव परिसरात दुसरी चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

lohgaon

शेतकऱ्याच्या घरातून तीन तोळे सोने चोरीला; एका आठवड्यात लोहगाव परिसरात दुसरी चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- ज्ञानेश्वर बोरुडे

लोहगाव (औरंगाबाद): लोहगाव ते बिडकीन रोडवरील तोडोंळी गावालगत शेतवस्तीवर रविवार (ता.९) रात्री अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व जवळपास तीन तोळे सोने दागिने लंपास केल्याची घटना घडली (theft in aurangabad). एका आठवड्यात लोहगाव परिसरात दुस-यांदा मोठी चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

या बाबत माहिती अशी की, तोडोंळी येथील शेतकरी लक्ष्मण रावसाहेब गरड यांच्या घरी रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी समोरील दरवाजाचा कडी कोडा तोडून एक तोळा सोने पोत, सर, नाकातील नथनी, नेकलेस, झुंबर आदी तीन तोळे दागिण्यासह संदुकीतील नगदी ३८००० हजार रुपयांची चोरी केली. पहाटे लक्ष्मण यांना जाग आली असता घर उघडे दिसल्याने घरात जाऊन पाहणी केली असता चोरीचा प्रकार झाल्याचे निदर्शनास आला.

हेही वाचा: दिलासादायक! मराठवाड्यात रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत; मृत्यूदरही घटला

सोमवार (ता.१०) बिडकीन पोलीस स्टेशनला महिला पोलिस पाटील मीनाताई तांबे, सरपंच संजय गरड यांनी कळवल्यानंतर फौजदार प्रशांत मुंडे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. लोहगाव परिसरात आठवड्यात दुसऱ्यांदा मोठी चोरीचा प्रकार घडल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शेतवस्तीवर राहणा-या शेतकरी कुटूंबात भीती निर्माण झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने याच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोविंद राऊत,समोल वसावे करत आहे.