Chhatrapati sambhaji nagar : धुकं म्हणालं थंडीला, येऊ का घरात ? घराबाहेर पडताच धुक्याची दुलई ; थंडीत हिलस्टेशनचा अनुभव
Winter Weather : शहरात शनिवारी सकाळी धुके इतके दाट झाले की, काही अंतरावरची माणसे आणि वाहने दिसत नव्हती. धुक्यामुळे हिलस्टेशनचा अनुभव घेणाऱ्या शहरवासीयांना थंड वातावरणाचा आनंद घेता आला.
छत्रपती संभाजीनगर : थंडीच्या दिवसांत उबदार कपडे परिधान करून धुक्यामधून मॉर्निंग वॉक करणारी, धावणारी माणसे, वाहने असे एखाद्या उंचावरील हिलस्टेशनवरचे दृश्य सिनेमात बघितलेले. मात्र, असाच अनुभव प्रत्यक्षात शहरवासीयांनी शनिवारी (ता. सात) सकाळी घेतला.