गारखेडा : घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून तब्बल १२ तोळे सोने लंपास केले. ही घटना २० जून रोजी भरदिवसा घडली. कुटुंबातील महिला सायंकाळी सहा वाजता घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.