तीन तास औरंगाबाद शहराचा पाणी उपसा बंद, चार दिवसांत दोनदा संकट | Aurangabad Municipal Corporation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply

तीन तास औरंगाबाद शहराचा पाणी उपसा बंद, चार दिवसांत दोनदा संकट

औरंगाबाद : शहरावरील पाणी संकट कायम आहे. गेल्या चार दिवसांत दोनवेळा शहराचा पाणी तीन-तीन तास बंद राहिल्याने पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यात तांत्रिक अडचणीमुळे वारंवार अडथळे येत आहेत. त्यात गेल्या चार दिवसांत जायकवाडी धरणातून दोन वेळा पाणी उपसा बंद झाला. औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने सोमवारी तीन तास शटडाऊन घेतला होता. त्यामुळे पाणी उपसा राहिला. त्यामुळे अनेक वसाहतींमधील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे गेले. त्यात बुधवारी पाणी योजनेचा वीजपुरवठा तीन तास खंडीत झाला. त्यामुळे दोन्ही योजनांद्वारे होणारा पाणी उपसा बंद राहिला. (Three Hours Water Pumping For Aurangabad City)

हेही वाचा: Aurangabad : अल्पवयीन मेव्हुणीवर बलात्कार, भावजीला मरेपर्यंत जन्मठेप

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले की, चार दिवसांत दोन वेळा पाणी उपसा बंद राहिल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सिडको, लक्ष्मी कॉलनी, हनुमान टेकडी, नागेश्वरवाडी या उंचावरील भागांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Water Supply In Aurangabad)

Web Title: Three Hours Water Pumping For Aurangabad City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top