esakal | औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कारची दुचाकीला धडक, तिघे गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

अपघाताची माहिती मिळताच आयआरबीच्या रुग्णवाहिकेचे विष्णू साठे, चंद्रशेखर हाटकर, गजानन काळे, विनोद छत्रे, डॉ. महेश जाधव, आत्माराम गाढेकर, विठ्ठल गायकवाड यांनी मदतकार्य करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले.

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कारची दुचाकीला धडक, तिघे गंभीर जखमी

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी व सोळा वर्षीय मुलगा असे तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील (Aurangabad-Solapur Highway) थापटीतांडा (ता.पैठण) शिवारात बुधवारी (ता.२६) रोजी सायंकाळी घडली. गोरख पुंजाराम भालसिंगे (वय ४५), तारा गोरख भालसिंगे (४०) व त्यांचा मुलगा भैय्या गोरख भालसिंगे (१६, तिघे रा.पाचोड, ता.पैठण) हे दुचाकीने (एमएच २० सीएफ १५४१) पाचोडहुन (Paithan) रजापुर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असताना थापटीतांडा शिवारात त्यांच्या पाठीमागे असलेल्या कारने (एमएच १२ जीएफ ३१०१) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. (Three Persons Serious Injured In Accident At Aurangabad-Solapur Highway)

हेही वाचा: तरुण डाॅक्टरची झुंज अयशस्वी, आर्थिक मदत लवकर मिळाली असती तर..

यात दुचाकीवरील तिघे ही खाली कोसळून गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आयआरबीच्या रुग्णवाहिकेचे विष्णू साठे, चंद्रशेखर हाटकर, गजानन काळे, विनोद छत्रे, डॉ. महेश जाधव, आत्माराम गाढेकर, विठ्ठल गायकवाड यांनी मदतकार्य करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करित आहेत.