छत्रपती संभाजीनगर : शहरात सलग दुसऱ्या दिवशीही गुरुवारी (ता. १२) विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने तडाखा दिला. तासभर पडलेल्या पावसाने शहरात पुन्हा ११ झाडे पडली, तर अनेक भागांतील घरांत पाणी शिरले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती..हवामान खात्याने मागील तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिला होता. त्यात बुधवारी (ता. ११) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याने शहराला झोडपून काढले. ३७ झाडे पडली, सिद्धार्थ उद्यानातील दुर्घटनेत दोन महिलांचे बळी गेले. काल पाऊस मात्र झाला नाही. त्याची कसर पावसाने गुरुवारी (ता. १२) भरून काढली. दुपारपर्यंत पावसाचे कसलेही वातावरण नसताना सायंकाळी ५ पासून ढग आले. आणि सायंकाळी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. सोबतीला सोसाट्याचे वारेही होते..तासाभरात जोरदार पाऊस शहराच्या विविध भागांत झाला. वेधशाळेत या पावसाची १८ मिमी नोंद झाली. या वादळी वारे आणि पावसामुळे शहरात ११ ठिकाणी झाडे पडल्याचे कॉल अग्निशमन दलाला आले. जुबिली पार्क, उत्सव मंगल कार्यालयाच्या मागे, पवननगर, आंबेडकर चौक, चिश्तिया कॉलनी, उल्कानगरी, चाणक्यपुरी दर्गा चौक, बन्सीलालनगर, नंदनवन कॉलनी, देवगिरी कॉलनी आणि पदमपुरा या ठिकाणी प्रत्येकी एक झाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल रवाना झाले..झाडे रस्त्यातून हटवण्याचे काम सुरू होते. याशिवाय रोपळेकर हॉस्पिटल जवळ अंडरग्राउंडमध्ये पाणी साचल्याने पंपिंग करून काढण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली..Chh.Sambhaji Nagar News : सप्टेंबरमध्ये प्रभाग रचनेची अधिसूचना; बिनव्याजी कर्जासाठी महापालिकेचा प्रस्ताव.मनपाची कंट्रोल रूमपावसाळ्यात आपात्कालीन स्थितीत नागरिकांची मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे मॉन्सून कंट्रोल रूम सुरू करण्यात आली. आपत्कालीन स्थितीत नागरिक ०२४०-२६१७१६५ आणि ०२४०-२६१७१६६ या क्रमांकांवर संपर्क करू शकतात. नागरिकांच्या हितार्थ सदरील कंट्रोल रूम सुरू करण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.