esakal | औरंगाबाद: आजपासून शहरातील ४१३ शाळेची घंटा वाजणार । School
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद: आजपासून शहरातील ४१३ शाळेची घंटा वाजणार । School

औरंगाबाद: आजपासून शहरातील ४१३ शाळेची घंटा वाजणार । School

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या व खासगी शाळा सोमवार (ता.चार ) पासून सुरू होणार आहेत. आठवीपर्यंत असणाऱ्या ३९३ तर आठवी ते बारावीपर्यंत असणाऱ्या ४१३ शाळा सुरू होणार आहेत. अशा ८०६ शाळा सुरू होणार आहेत. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार या शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांतही आनंदाचे वातावरण असून , बच्चे कंपनीमुळे ओसाड भासणाऱ्या शाळा पुन्हा गजबजणार आहेत.

हेही वाचा: मित्रानेच केला मित्राचा खून, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियमांच्या तरतूदीनुसार नियमावली प्रसिध्द करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने लावण्यात आलेले निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे आता सोमवार ( ता. चार ) पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीतील ८ वी ते १२ वी पर्यतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी काढले आहेत.

त्यानुसार महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांच्या उपस्थितीत शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक घेण्यात आली. शहरातील खासगी माध्यमिक विभागाच्या तसेच पालिकेच्या अशा एकूण ४१३ शाळा शहरात सुरू होत आहे. यात पालिकेच्या १७ शाळांचा समावेश आहे. या ४१३ शाळांमध्ये ७८ हजार विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. तसेच ३ हजार ५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

हेही वाचा: औरंगाबाद: स्टार्ट अप-लॉकडाऊनने दाखविली व्यवसायाची दिशा

समितीचे राहणार लक्ष

महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून उपायुक्त तथा विभागप्रमुख, सर्व प्रभाग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश राहणार असल्याची माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी दिली.

  • शाळा सुरू करण्यासाठी ४८ तासापूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे.

  • केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे लेखी संमतीपत्र घेतले जाणार आहे.

  • ज्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील, त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहावे.

  • ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, ऑफलाइन पध्दतीचा पर्याय निवडलेला असेल त्यांच्यासाठी शिक्षण पुर्वीप्रमाणे सुरू ठेवावे.

  • सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, खासगी वाहनचालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे आवश्यक आहे.

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण आवश्यक आहे.

  • शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्व एसओपीचे पालन आवश्‍यक .

loading image
go to top