औरंगाबाद: स्टार्ट अप-लॉकडाऊनने दाखविली व्यवसायाची दिशा । Start-up | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद: स्टार्ट अप-लॉकडाऊनने दाखविली व्यवसायाची दिशा

औरंगाबाद: स्टार्ट अप-लॉकडाऊनने दाखविली व्यवसायाची दिशा

औरंगाबाद: कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन मध्ये कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, चांगला व्यवसाय बुडाला तर कित्येकांना आपले नाईलाजाने आपले मुळ गाव गाठावे लागले. लॉकडाऊनमध्ये आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कित्येकांना नैराश्‍याने गाठले.

मात्र लॉकडाऊन, नैराश्‍याच्या वातावरणात ही नव्याने उभे राहण्याचे किमया बद्रीनाथ फलके यांनी साकारली. वर्षभरातच त्यांनी आपला स्वतःचा रेणुका मसाले ब्रॅण्ड विकसित केला. वर्षभरातच त्यांच्या मसालाची गोडी महाराष्ट्रसह सात राज्यातील लोकांना लागली आहे. आता महिन्याला ८० ते ९० क्विंटल पर्यंत मसाला तयार होईल यंत्रणा त्यांनी तयार केली आहे. लॉकडाऊनच्या संकटात त्यांनी सुरु केलेल्या मसाल्याचे स्टार्टअप आज नवीन ब्रॅण्ड बनले आहे.

हेही वाचा: सैन्‍यदलाच्या अधिकारीपदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू  

शिक्षणानंतर चांगली नोकरी

बद्रीनाथ फलके हे मुळचे तळेगाव (ता.फुलंब्री) येथील असून त्यांनी वडीलोपार्जित पंधरा एकर कोरडवाहु शेती आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेतच त्यांनी सातवी पर्यंत तर दहावीपर्यंत शिक्षण ही गावातील शाळेत झाले. यानंतर त्यांनी चाटे बिझनेस स्लुक मधून एमबीएचे शिक्षण पुर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी २०१० ते २०२० पर्यंत शहरातील प्रतिष्ठीत अशा खासगी कोचिंग क्लासेस मध्ये मार्केटींग विभागात चांगल्या पदावर नोकरी केली.

नोकरी करत असतांना कोरोनमुळे पहिला लॉकडाऊन लागला. पहिला लॉकडाऊन त्यांना फारसा जाणवले नाही. मात्र दुसऱ्या लॉकडाऊननंतर त्यांची चिंता वाढत गेली. ही चिंता इतकी वाढली की त्यांना नैराश्‍य सुद्धा आले. लॉकडाऊन मध्ये नैराश्‍यात त्यांनी एक दिवस एक गोणीभर कांदा कापुन टाकला. आपण काय करत आहोत हे सुद्धा त्यांना कळतं नव्हते. त्यांना वाटले आता पत्नी रागावेल मात्र ती मुळीच रागावली नाही.

हेही वाचा: समुद्रात मासेमारीला जात असताना नौका गाळात रुतली

उलट चांगले झाले तुम्ही कांदे कापले मला मसाले करायचे आहे असे सांगितले. एवढ्या संकटाच्या काळात ही पत्नी बिलकुल रागावली नाही. ती पॉझिटीव्ह राहु शकतो तर मी का राहु शकत नाही असा विचार बद्रीनाथ फलके यांच्या मनता आला. मग त्यांनी स्वतःच मसाले तयार करता येईल का ? असा विचार केला आणि घरगुती मसाले तयार करण्याचा आपल्या नवीन प्रवासाला सुरवात करण्याचा दृढ निश्‍चय केला.

घरगुती मसाले तयार करण्यास केली सुरवात

पहिल्या दिवशी फलके यांनी घरातच अडीच किलोचा मसाला तयार केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी मार्केट मध्ये जाऊन कांदे, कोंबथीर आणली मात्र फ्लॅट मधील अनेकांनी हा कांदा आणि कोंथबीर विकत घेऊन टाकली. यातून त्यांच्या हातात २७०० रुपये पडले. आपण आज कांदे व कोंथबीर विकली मग लाज कशाला वाटु द्यायची हे ठरवत त्यांनी नैराश्‍य झटकुन कामाला सुरवात केली.

हेही वाचा: सैन्‍यदलाच्या अधिकारीपदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू  

त्यांच्या ताईचे शिवनेरी कॉलनीतून गृहउद्योग आहे. तेथे त्यांनी दाळबट्टीचे पीठ बनविले. त्याला ही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्याकडे अगोदरपासून इराणी मसाले होते. याला सुद्धा मुंबईहुन ऑर्डर मिळाली. मग सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेल्या घरगुती मसाल्याची मार्केटींग केली. त्यामुळे त्यांना कोल्हापुर, मुंबई, नाशिक येथून मसाल्याची ऑर्डर मिळाली. हे मसाले ग्राहकांना खुप आवडले. त्यामुळे त्यांनी पॅकींग मशीन विकत घेतले. स्टीकर तयार केले आणि मसाल्याची आकर्षक पॅकींग तयार केली.

मसाले थेट ग्राहकांना विक्री

बद्रीनाथ फलके यांनी स्वतःची पत्नी रेणुका यांच्या नावानेच ‘रेणुका मसाले’ नावानेच स्वतःचे ब्रॅण्ड विकसित केले. यामध्यमातून त्यांनी कुंदुरी स्पेशल काळा मटन मसाला, चिनक-मटन रेड ग्रेव्ही (घरगुती) मसाला, खान्देशी मसाला, कांदा-लसून मसाला, येसुर (बंगा) ग्रेव्ही मसाला, हैद्राबादी-इराणी चहा मसाला, हळद, धनिया पावड अशा विशिष्ट चवीचे घगगुती मसाले तयार करण्यास सुरवात केली.

सोबतच त्यांनी दाळबट्टी पीठ, राजगिरी पीठ, उपावसाची भाजणी विक्रीला ठेवली आहे. त्यांनी एक किलो आणि अर्धा किलो पॅकींग मध्ये तयार केलेले मसाले हे आज महाराष्ट्र, कर्नाटक, हैद्राबाद, मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेशात विक्रीला जात आहे. त्यांनी व्यवसाय करतांना थेट ग्राहकांनाच माल विक्री करण्यावर प्राध्यान्य दिले आहे. ते स्वतः, पत्नी, भाचा, त्यांच्या ताई तसेच दोन महिला अशा सहा व्यक्ती मिळून मसाले तयार करतात मात्र आता मागणी खुप जास्त झाल्याने त्यांनी आता महिन्याला ८० ते ९० क्विंटल पर्यंत मसाले तयार करता येईल असा नवीन सेटअप उभा केला आहे.

ग्राहकांना हवीय घरगुती चव

खवय्यांचा संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे. सर्वांना घरगुती चवीचे मसले हवे आहे. तसेच लॉकडाऊननंतर अनेक जण घरातच विविध प्रकारचे पदार्थ तयार करुन खाण्यास प्राधान्य देताहेत. त्यामुळे बद्रीनाथ फलके यांनी तयार केलेले मसाले हे घरगुती चवीचे आहे. त्याचे मार्केट मोठे तर आहेच शिवाय भविष्यात ही त्याची मागणी वाढती आहे त्यामुळे त्यांनी घरगुती चवीला जास्त प्राधान्य दिले.

टॅग्स :Aurangabad News