esakal | औरंगाबादेत ६९ कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३६ हजार ८०७ कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

3corona_1180

औरंगाबाद जिल्ह्यात आज रविवारी (ता. एक) एकूण ६९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

औरंगाबादेत ६९ कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३६ हजार ८०७ कोरोनामुक्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज रविवारी (ता. एक) एकूण ६९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ हजार २१० झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ७२ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ३३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये महापालिका हद्दीतील १८ व ग्रामीण भागातील सहा रुग्ण आढळले आहेत. आज १९८ जणांना सुटी झाली. यात शहरातील १५१ व ग्रामीण भागातील ४७ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ३६ हजार ८०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांच्या घरावर मोर्चा काढत विचारणार जाब, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या)

संभाजी कॉलनी (१), पोलिस कॉलनी, क्रांती चौक (२), पुंडलिक नगर (१), देवळाई परिसर (१), विद्युत कॉलनी (१), पोलिस क्वार्टर, मिल कॉर्नर (१), एन अकरा हडको (१), आलमगीर कॉलनी (३), उस्मानपुरा (१), बीड बायपास (२), बन्सीलाल नगर (१), कासलीवाल मार्बल (१), गजानन नगर (१), विठ्ठल नगर (१), गुलमंडी परिसर (१), शिवाजी नगर (४), एन अकरा सिडको (२), अयोध्या नगर (२), श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी (१), अन्य (४), सौजन्य नगर (१), सुपारी हनुमान मंदिर परिसर (१),
हिमायत नगर (१).

ग्रामीण भागातील बाधित
कन्नड (१), पैठण (२), टाकळी कन्नड (१), धोतरा सिल्लोड (१), शंकर नगर, वैजापूर (१), वाणी वस्ती, वैजापूर (१), वैजापूर (१), भागगाव, वैजापूर (२), पळशी (१), गंगापूर (१), सिल्लोड (४)

कोरोना मीटर
--------
बरे झालेले रुग्ण : ३६८०७
उपचार घेणारे रुग्ण : ३३१
एकुण मृत्यू : १०७२
---------
आतापर्यंतचे बाधित : ३८२१०
---------


संपादन - गणेश पिटेकर

loading image