esakal | जरंडी परिसरात मुसळधार; पुराच्या पाण्यात एक जण गेला वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

पुराच्या पाण्यात तरुण गेला वाहून

जरंडी परिसरात मुसळधार; पुराच्या पाण्यात एक जण गेला वाहून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जरंडी : जरंडीसह परिसरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कसाईखोरा नाल्याच्या पुरात ४२ वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना रविवारी उघडकीस आली हा तरुण रात्री घराकडे येत असतांना त्याला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने रात्रीच पाण्यात वाहून गेला रविवारी ता.०५ त्याचे शव नाल्याच्या पाण्यात तरंगतांना आढळून आले.या घटनेमुळे जरंडी भागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधब्याची दृश्ये!; पाहा व्हिडिओ

जरंडी ता.सोयगाव येथे शनिवारी रात्री मुसळधार अतिवृष्टीचा पावूस झाला यामध्ये जरंडीच्या धिंगापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे सुकी नदीला पूर आला होता आलेल्या पुराचे पाणी नदीच्या काठावर असलेल्या निंबायती गावात शिरले त्यामुळे गोंधळ उडाला होता.दरम्यान जरंडी ता.सोयगाव येथील विजय लखा राठोड हा तरुण पावूस थांबल्यावर रात्रीच घराकडे येत असतांना कसाईखोरा नाल्याच्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेला त्याचे शव रविवारी पहाटे आढळून आले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला तहसीलदार रंमेश जसवंत यांनी मृताच्या कुटुंबियांची भेट घेवून आपत्ती निवारण कक्षात घटनेची नोंद करण्यात आली आहे.विजय राठोड हा घराकडे येत असतांना नाल्याच्या पुरातून त्याचा तोल गेल्याने तो वाहून गेला होता.

हेही वाचा: मराठवाड्यात मुसळधार पावसाचं थैमान; पाहा व्हिडिओ

घरांची पडझड; पिकांचे नुकसान

जरंडी, निंबायती आणि तिखी गावात घरांची पडझड झालेली असून तब्बल २० घरे कोसळून उध्वस्त झाली आहे.जरंडी गावाच्या खडकी नदीला तब्बल १० तास पूर आलेला होता.जरंडी मंडळात ८५ मी.मी पावसाची नोंद करण्यात आली असून शेतातील पिके पाण्याखाली आली आहे.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तहसीलदार रमेश जसवंत यांनी नुकसानीच्या भागांचा दौरा करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानीची माहिती कंपनीला कालाविण्याबाबत आवाहन केले आहे.

loading image
go to top