esakal | औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गुरूवारपासून होणार खुली; पर्यटकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Ellore

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानूसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद ठेवण्यात आलेली अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा ही पर्यटनस्थळे गुरूवार (ता. १०) पासून पर्यटकांसाठी खुली करावीत.

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गुरूवारपासून होणार खुली; पर्यटकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद  : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानूसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद ठेवण्यात आलेली अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा ही पर्यटनस्थळे गुरूवार (ता. १०) पासून पर्यटकांसाठी खुली करावीत. त्यादृष्टीने यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आणि पर्यटकांनी नियमांचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

Corona Update : नवे ७३ जण कोरोनाबाधित, औरंगाबाद जिल्ह्यात उपचारानंतर आणखी ८० बरे

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.आठ) बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी हे निर्देश दिले. ते म्हणाले, की जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सर्व खबरदारीच्या उपाययोजनांसह सुरू करण्यात येतील . पर्यटनाशी संबंधित रोजगार असणाऱ्या संबंधितांची पर्यटनस्थळाच्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्याची संबंधित यंत्रणेने तातडीने सुविधा उपलब्ध करून द्यावी.वेरूळ व अजिंठा येथे दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राहील. दररोज केवळ सकाळी एक हजार तर दुपारी एक हजार अशा दोन हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन किंवा क्युआर बेस तिकिटांची नोंदणी करता येईल. यासाठी www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी. तसेच पर्यटनस्थळी आरोग्य यंत्रणेने व पोलिस विभाग यांनी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहुन पर्यटकांना कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. वेरूळ अजिंठा येथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे निर्देश यावेळी संबंधितांना दिले.

संपादन - गणेश पिटेकर

loading image