छावणी बाजारात वीस म्हशींची विक्री, व्यापारी पैसे न देताच झाला पसार

3crime_201_163
3crime_201_163

औरंगाबाद : नंदुरबार जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला म्हशी विक्री करुन देण्याच्या नावाखाली व्पापाऱ्यांनी औरंगाबादेत आणले. दिवसभर छावणी बाजारात म्हशी विक्री केल्यानंतर साडेपाच लाख रुपये न देता गुंगारा देवून पलायन केले. ही घटना गुरुवारी (ता. एक) मध्यवर्ती बसस्थानका समोर घडली. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


फसवणूकी संदर्भात अक्षय पुरुषोत्तम उगले (वय २३, रा. प्रतापूर, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार) यांनी तक्रार दिली. उगले हे शेती आणि दूध विक्रीचा व्यवसाय करतात, त्यांच्याकडे चाळीस म्हशी विक्रीसाठी होत्या. त्यामुळे व्यापारी देविदास बाबुलाल चव्हाण हा ३० सप्टेंबर रोजी म्हशी खरेदी आला. व्यवहार वीस लाख रुपयांमध्ये ठरला. त्यानुसार आरोपी देविदास चव्हाणने साडेचार लाख रुपये आगाऊ रक्कम उगले यांच्या वडिलांना दिली. त्यानंतर त्याच दिवशी देविदास, त्याचा मुलगा अजय, राहुल विजय चव्हाण यांनी सायंकाळी दोन ट्रकमध्ये वाहनांमध्ये प्रत्येकी दहा याप्रमाणे एकूण वीस म्हशी भरल्या.

रात्री १० वाजता हे सर्वजण औरंगाबादच्या छावणी बाजारात निघाले. ठरल्याप्रमाणे सोबत अक्षय उगले त्यांचे मित्र बावा पाडवी, देविदास चव्हाण व कार चालक लेखू गोसावी हे ट्रक सोबतच राहिलेले साडेपाच लाख रुपये घेण्यासाठी कारने निघाले. गुरुवारी (ता. ११) रोजी सकाळी सात वाजता हे सर्वजण छावणी बाजारात पोहोचले. याठिकाणी अमोल गवळी यांच्या गोठ्यात स्थानिक व्यापाऱ्यांच्या मदतीने दिवसभर म्हशी विक्री केल्या.

सायंकाळी देविदास चव्हाणने काही पैसे कमी असल्याचे सागंत माझे नातेवाईक जालना येथून पैसे घेऊन निघाल्याचे सागून मध्यवर्ती बसस्थानकात आणले. बराच वेळ थांबवल्यानंतर बसस्थानकासमोरुन गुंगारा देवून देविदास चव्हाण पसार झाला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात आरोपी देविदास बाबुलाल चव्हाण (रा. अजेंग वडेल, ता. मालेगाव, जि. नाशिक), अजय देविदास चव्हाण, राहुल देविदास चव्हाण आणि विजय देविदास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक उपनिरिक्षक संतोष राउत तपास करत आहेत.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com