
पाथरी : शेतात कापसाच्या आंतरमशागतीसाठी बैलजोडीच्या साह्याने काम सुरू असताना, विद्युत प्रवाह उतरलेल्या पोलवरील ताणाला स्पर्श झाल्याने शेतकऱ्यासह दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील पाथरगव्हाण (बु ) शिवारात शुक्रवारी (ता.११) सकाळी घडली.