Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेत दरड कोसळून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू
Chh Sambhajinagar: केदारनाथ यात्रेदरम्यान डोंगरातील दरड कोसळून बजाजनगरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बजाजनगर : केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या वडगाव कोल्हाटी येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर परमेश्वर भीमराव खवल (वय ३८, रा. साईबन हाऊसिंग सोसायटी) यांचा दरड कोसळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १६) सकाळी दहाच्या सुमारास घडली.