Tractor Accident: देवदर्शन घेऊन परतांना भाविकांवर काळाचा घाला; दोन महिला भाविकांचा मुत्यु, २४ जखमी, एकीची प्रकृती चिंताजनक
Accident News: कन्नड तालुक्यातील पिनाकेश्वर महादेव दर्शनानंतर परतत असलेल्या भाविकांवर ट्रॅक्टर अपघाताने काळाचा घाला. दोन महिला भाविकांचा मृत्यू, २४ जखमी, एका मुलीची प्रकृती गंभीर.
कन्नड : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर (मोठ्या) महादेवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना कन्नड तालुक्यातील खामगाव येथील ट्रँक्टर पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगराच्या घाटातील दरीत कोसळुन झालेल्या अपघातात दोन महिला भाविकांचा मुत्यु झाला.