Independence Day Fashion: स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा फॅशनचा ट्रेंड; टी-शर्ट, फ्रॉक, ओढणी आणि कुर्ता-पायजमा यांना पसंती
Tricolour Trend: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यंदा बाजारात ‘आय लव्ह माय इंडिया’ प्रिंट असलेले टी-शर्ट आणि तिरंगा रंगातील फ्रॉक लोकप्रिय ठरत आहेत. ग्रामीण व शहरी भागात देशभक्तीचे कपडे विक्रीचा नवा ट्रेंड निर्माण करत आहेत.
अंगुरीबाग : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजारात ‘आय लव्ह माय इंडिया’ लिहिलेले आणि तिरंगा असलेले टी शर्ट उपलब्ध झाले. याचबरोबर मुलींसाठी पूर्ण तिरंगा रंगातील फ्रॉकही लोकप्रिय होत असून, त्याचा ट्रेंड सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.