
फुलंब्री : छत्रपती संभाजी नगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरामध्ये एका ट्रकने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेऊन एकाच कुटुंबातील तिघांना चिरडल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) चार वाजेच्या सुमारास घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. गोपालसिंग मंगलसिंग चंदनशे वय ३५, ऋदय गोपाल चंदनशे वय ८ वर्ष, अवनी गोपाल चंदनशे वय ९ वर्ष असे अपघातात ठार झालेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. तर मीना गोपालसिंग चंदनशे सदरील महिला गंभीर जखमी आहे.