Aurangabad | वाळूजमध्ये ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, एक जण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Aurangabad | वाळूजमध्ये ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, एक जण ठार

वाळूज (जि.औरंगाबाद) : भरधाव जाणारी मालवाहू ट्रक दुभाजकला धडकून विरुद्ध बाजूने असलेल्या दुचाकीला चिरडत जवळजवळ शंभर ते दीडशे फूट शेतात जाऊन ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक ट्रकखाली दबला असून तो मदतीसाठी याचना करत आहे. तर दुचाकी वरील एक जण ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. हा अपघात (Accident) बुधवारी (ता. २५) रात्री सव्वा सात वाजेच्या सुमारास वाळूजजवळ (Waluj) झाला. या अपघातातील मालवाहू ट्रक (एमएच ०४ एफडी ८२३०) हा वाळुजकडून गंगापूरकडे जात होता. (Truck-Two Wheeler Accident, One Died, One Injured In Waluj Of Aurangabad)

हेही वाचा: आज खासदार नसलो, तरीही मी खासदारापेक्षा अधिक काम करतो : चंद्रकांत खैरे

तो वाळूजजवळील बडवे कंपनी समोर येताच भरधाव ट्रक दुभाजकावर धडकून विरुद्ध बाजूला असलेल्या प्रभाकर व्यंकटेश कुलकर्णी (वय ५१ , रा. नायगाव बकवालनगर) यांच्या दुचाकीला चिरडत जवळजवळ शंभर ते दीडशे फूट शेतात जाऊन उलटला. या ट्रकच्या केबिनमध्ये चालक अडकून पडला असून तो मदतीसाठी याचना करित होता. दरम्यान दुचाकीला धडकलेल्या ट्रकखाली दोन दुचाकीवरील प्रभाकर कुलकर्णी हा ट्रकखाली चिरडून जागीच दबल्याने ठार झाला. पोलिसांनी ट्रक उचलण्यासाठी क्रेनला पाचारण केले. दरम्यान वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस अंमलदार किशोर साबळे, सचिन राजपूत, विजय त्रिभुवन, सहायक पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, अभिमन्यू सानप, विजयसिंग जारवाल यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. (Aurangabad Accident Updates)

हेही वाचा: 'लिचिंग करणाऱ्यांना पाकिस्तानात फाशी, मात्र भारतात होतोय सत्कार!'

तीन कंपन्या बंद

या अपघातग्रस्त ट्रकने ३३ हजार केव्हीच्या विद्युत खांबाला जोराची धडक दिली. त्यामुळे विद्युत खांब तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे बडवे कंपनीचे दोन प्लांट व नहार यांची लुमिनेक्स अशा तीन कंपन्यांचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. महावितरण कंपनीचे सहायक अभियंता खंडागळे, किरण वाघचौरे व त्यांच्या टीमने तात्काळ धाव घेत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

एकाचा पत्ता लागेना

या अपघातातील दुचाकीचालक प्रभाकर कुलकर्णी यांच्यासोबत त्यांचा मित्र होता. त्याचे नाव, गावाचा पत्ता मिळाला नाही. शिवाय तो ट्रकमधील सामना खाली दबला की अपघातानंतर निघून गेला. याबाबत काहीही पत्ता लागेना पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Truck Two Wheeler Accident One Died One Injured In Waluj Of Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top