Sambhaji Nagar News : ट्रकचे ब्रेक फेल नव्हे, तर चालकाचे सुटले नियंत्रण

उतार, चुकीचे गतिरोधकही अपघाताला कारण
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर वाल्मी नाका येथे झालेल्या अपघातात ट्रकचे ब्रेक निकामी झाले नाही, तर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अहवाल परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दिला आहे. असे असले तरीही रस्ता आणि परिस्थितीशी संबंधित तपासणीच्या तांत्रिक अहवालानंतर अजून काही बाबी स्पष्ट होणार आहेत. रस्त्याचा तीव्र उतार आणि चुकीचे स्पीड ब्रेकर अपघाताला कारणीभूत ठरल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.

वाल्मी नाका येथील उड्डाण पुलाखाली सळया घेऊन जाणाऱ्या ट्रकने ७ दुचाकी, तीन कार, तीन टेम्पोंना धडक दिली. या अपघातात एक महिला ठार झाली तर १८ जण जखमी झाले होते. हा अपघात अत्यंत भयानक होता. प्रत्येक वाहन एकमेकांमध्ये अडकले होते. कोणते वाहन कुठे चालले हे काही कळत नव्हते. ट्रकने एकापाठोपाठ वाहनांना चिरडल्याने अत्यंत विदारक अशी परिस्थिती घटनास्थळी निर्माण झाली होती.

sambhaji nagar
Sambhaji Nagar Crime News : घरफोडीत आठ लाखांचा ऐवज लंपास ; चोरटे दुचाकी तसेच चोरी करण्याचे साहित्य सोडून पसार

ट्रकचे ब्रेक सुस्थितीतच

अपघातग्रस्त ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, घटनेनंतर तातडीने प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या पथकाने अपघातग्रस्त ट्रकची बारकाईने तांत्रिक तपासणी केली. विशेषतः ट्रकचे ब्रेक, क्लच, ॲक्सीलरेटर, गिअर याची तपासणी केली. वाहनाचे अनियंत्रित होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील असे सर्व पार्टस् काम करत होते. ब्रेक फेल झालेला नाही, तर चालकाकडून वाहन अनियंत्रित झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आरटीओ अधिकाऱ्यांच्या पथाकाने काढला आहे.

तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा

अपघातानंतर आरटीओच्या पथकाने अपघातग्रस्त वाहनाची तपासणी करुन प्राथमिक अहवाल दिला. त्यानंतर शनिवारी (ता. वीस) पुन्हा घटनास्थळी जाऊन रस्त्याची पहाणी करण्यात आली. ट्रक सोलापूर-धुळे महामार्गावरुन आल्यानंतर वाल्मी चौकात खाली उतरला. महामार्गावरुन वाहन खाली उतरल्यानंतर उताराच्या शेवटच्या टोकाला गतिरोधक केलेले आहे. हे गतिरोधक उताराच्या सुरवातीला आणि मध्येही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हा उतार तांत्रिकदृष्ट्या योग्य की अयोग्य याची पहाणी या पथकाने केली आहे. मात्र अद्याप याचा अहवाल दिलेला नाही. या अहवालानंतर संबंधीत विभागाला उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सुचवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ट्रकचालक गजाआड

ओडिशावरून विनाथांबा ट्रकचालकाने केलेला प्रवास वाल्मी नाका येथील अपघाताला कारणीभूत ठरला. त्याला सातारा पोलिसांनी जेरबंद केले. या ट्रकचालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर ट्रकचालक समाधान रामभाऊ रुपेकर (रा. वडगाव कोल्हाटी) हा पसार झाला होता. या प्रकरणी जखमी सुलेमान महेबूब शेख रा. वडगाव, गेवराई यांनी तक्रार दिली आहे. रुपेकरने चौदाशे किलोमीटरचा प्रवास केला असल्याची माहिती पोिलसांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com