अजिंठा लेणीत बारा कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

तालुका आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी यश आले असताना अचानक बारा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे
corona
coronacorona

सोयगाव (औरंगाबाद): कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी यशस्वी झालेल्या सोयगाव तालुक्यात रविवारी १२ जण अजिंठ्याच्या लेणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालील वाळू सरकली असून प्रशासनाने खबरदारी घेत सहा जणांना जरंडीच्या कोविड केंद्रात दाखल केले. तर इतरांची सायंकाळी उशिरा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

तालुका आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी यश आले असताना अचानक बारा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये अजिंठा लेणीत काम करणारे मजूर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे तालुका आरोग्य विभागात धावपळ उडाली असून अजिंठ्याच्या लेणीत सकारात्मक आढळलेल्या १२ रुग्णांपैकी सहा रुग्णांना तातडीने जरंडीच्या कोविड केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी दिली.

corona
तब्बल ३० वर्षांची प्रतीक्षा संपली, बरड वस्तीला मिळाली वीज

उर्वरित रुग्णांनाही रात्री उशिरापर्यंत उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण घालण्यासाठी तालुक्यात कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्यात आलेला असून नियमित शंभरावर चाचण्या होत असून तपासणीसाठी नमुने औरंगाबादला पाठविण्यात येत आहे.

तालुक्यात कोरोना चाचण्या वाढविण्यात आलेल्या आहे. तिसऱ्या लाटेवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून चाचण्यांचा वेग वाढविण्यात येत आहे. त्यात रविवारी १२ रुग्ण सकारात्मक आढळले आहे. त्यांना तातडीने जरंडीला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे असून मास्कचा वापर करावा.
डॉ.श्रीनिवास सोनवणे
-तालुका आरोग्य अधिकारी सोयगाव


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com