Chh. Sambhajinagar: डोळे तपासणीसाठी शाळेतून गेलेले दोन भाऊ दोन दिवसांपासून बेपत्ता; गंगापूर तालुक्यात खळबळ
Missing Brothers : गंगापूर तालुक्यातील पेंढापूर गावचे दोन सख्खे भाऊ, कृष्णा (१५) आणि यश (१३) जाधव, शाळेतून डोळे तपासणीसाठी गेल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. दोन दिवस उलटूनही त्यांचा मागोवा लागलेला नाही.
कायगाव, (ता. गंगापूर) : डोळे तपासण्यासाठी शाळेतून गेलेल्या दोन सख्खे भाऊ दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील शाळेतून ते दोघे निघून गेले होते.