
गंगापूर : तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथील सिद्धार्थ चव्हाण (वय १२) याचा खून करून शिवारातील विहिरीत फेकून दिल्याचे १४ ऑगस्टला समोर आले. याचा तपास सुरू असतानाच सिद्धार्थचा सख्खा चुलतभाऊ सोपान ऊर्फ स्वप्निल संजय चव्हाण (वय २२) याचा मृतदेह सोमवारी (ता. १८) चुलतभाऊ शरद गंगाधर चव्हाण यांच्या शेतात आढळला.