
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील वारेगाव येथील मित्रासह आईला फुलंब्री येथून घेऊन जाण्यासाठी येत असताना काळाने घाला घातला. खुलताबाद रस्त्यावरील शांतिनिकेतन शाळेच्या परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन्ही मित्र ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. २०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. मच्छिंद्र सटवा कापसे (वय २८) आणि नीलेश शंकू संकपाळ (वय ३६, रा. वारेगाव, ता. फुलंब्री) अशी त्यांची नावे आहेत.